Majhi bahan ladki yojana ‘लाडकी बहीण’साठी आधार कार्ड बँकशी लिंक करा; तरच मिळणार 3000 हजार रुपये

Majhi bahan ladki yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत १ कोटी ६२ लाख महिलांनी नोंदणी केली आहे. अर्ज केलेल्या प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र ज्या पात्र महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाही, त्या महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक करून घेण्याची सूचना जिल्हा अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.‌

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया १४ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात ८० लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम तीन हजार रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांना शनिवार १७ ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळणार आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

Majhi bahan ladki yojana राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment